घर थंड ठेवण्याचा स्वस्त पर्याय, ही ५ रोपं तुमचं Home करतील Cool

घरात लावण्यात येणाऱ्या या रोपांना जास्त सूर्यप्रकाशाची आवश्यकता नसते. तसंच पाणीदेखील कमी लागतं. गरम वातावरणातही ते सहज जगतात. त्यामुळे ही रोप लावून घराची शोभा वाढवण्यासोबतच घरात गारवा राखण्यास आणि हवा शुद्ध होण्यास मदत होऊ शकते.
घर गार ठेवण्याचे पर्याय
घर गार ठेवण्याचे पर्यायEsakal

उन्हाचा तडाखा वाढत गेला की घराबाहेरच काय तर घरातही प्रचंड गरम होऊ लागतं. आपल्यापैकी अनेक जण घर गार ठेवण्यासाठी वेगवेगळे प्रयत्न सुरू करतात. एसी आणि कुलरच्या मदतीने घर गार ठेवणं शक्य असलं तरी यामुळे प्रचंड वीज बिल येतं. Plants which will keep your home cool marathi tips

शिवाय यामुळे प्रदूषणालाही Pollution हातभार लागतो. मात्र जर तुम्हाला घर गार ठेवण्यासाठी एसी आणि कुलर Cooler पेक्षा स्वस्त पर्याय मिळाला तर होय आज आम्ही तुम्हाला याच पर्याय बद्दल सांगणार आहोत.

इनडोअर प्लांट्स म्हणजेच घराच्या आत लावण्यात येणारी रोपं Plants हा घर गार ठेवण्यासाठीचा एक उत्तम पर्याय आहे. तुमच्यापैकी अनेक जणांच्या घरात इनडोअर प्लांट्स Indoor Plants असतील पण फार फार एक किंवा दोन. मात्र उन्हाळ्यात वाढत्या गरमीचा विचार करता तुम्ही काही अशी रोपं लावणं गरजेचं आहे ज्यामुळे घर तर गार राहीलच शिवाय घरातील हवा शुद्ध होईल. इनडोअर प्लांट्स मुळे तुमच्या घराची शोभा देखील वाढेल. 

1. कोरफड- त्वचा थंड ठेवण्यासाठी आणि सनबर्न पासून त्वचेचं रक्षण करण्यासाठी कोरफड मदत करते. मात्र, त्यासोबतच तुमचं घर गार ठेवण्यासाठी देखील कोरफड उपयोगात येऊ शकते. कोरफडच रोप घरात लावल्यास तुमचं घर गार राहण्यास मदत होईल. त्याचसोबत घरातील अशुद्ध हवा बाहेर टाकण्यास मदत होईल. त्यामुळे तुम्ही घराच्या कोणत्याही कोपऱ्यात जिथे दिवसा काहीशा प्रमाणात सूर्यप्रकाश येत असेल अशा ठिकाणी हे कोरफडीचे रोप लावू शकता.

2. अरेका पाम ट्री- लिविंग रूमसाठी लोकप्रिय असलेल्या काही रोपांपैकी एक म्हणजे अरेका पाम ट्री. हे डेकोरेटिव इन्डोर प्लांट घरातील हवेत natural humidifier म्हणजेच नैसर्गिकरित्या गारवा निर्माण करण्याचं काम करतं. घरात गारवा निर्माण करण्यासोबतच ते हवेतील अनेक टॉक्सिन्स जसं की बेन्जाइन, फॉर्मलडेहाइड यांना घराबाहेर काढण्यास मदत करतं आणि हवा शुद्ध ठेवतं. 

3. फिकस ट्री - फिकस ट्री या रोपाला विपिंग फिग असंही म्हटलं जातं. या रोपाला देखील तुम्ही घराच्या आत ठेवू शकता. यामुळे घराच्या आतील हवेचं तापमान कमी होण्यास मदत होईल. हे रोप देखील घरातील हवा शुद्ध करण्यास मदत करतं. घरातील एखाद्या टेबलावर हे रोप तुम्ही ठेवू शकता. 

हे देखिल वाचा-

घर गार ठेवण्याचे पर्याय
Mini Arctic Ultra Air Cooler : आता फक्त 1225 रुपयांत मिळणार पाण्यावर चालणारा एसी!

4. फर्न प्लांट- घर नैसर्गिकरित्या गार होण्यासाठी तुम्ही फर्न प्लांट हे देखील घरात लावू शकता. घरातील तापमान कमी करून हवेत गारवा राखण्याचं काम हे रोप करतं. त्यासोबतच हवा शुद्ध करणाऱ्या रोपांपैकी हे एक महत्त्वाचं रोप मानलं जातं. घराच्या आत खिडकी जवळ किंवा सोफ्या समोरील टेबलावर देखील तुम्ही हे रोप ठेवू शकता.

5. स्नेक प्लांट- इंदूर प्लांटमध्ये लोकप्रिय असलेलं आणखी एक रोप म्हणजेच स्नेक प्लांट. हिरो रात्रीच्या वेळी ऑक्सिजन बाहेर सोडत असल्यामुळे घराच्या आतील वातावरण थंड राहण्यास मदत होते. हिरो हवेतील विषारी पदार्थ बाहेर फेकण्यास मदत करतात त्यामुळे घरातील हवा शुद्ध राहते. या रोपाचे  विविध प्रकार येतात जे घरात लावून तुम्ही घराची शोभा वाढवू शकता.

घरात लावण्यात येणाऱ्या या रोपांना जास्त सूर्यप्रकाशाची आवश्यकता नसते. तसंच पाणीदेखील कमी लागतं. गरम वातावरणातही ते सहज जगतात. त्यामुळे ही रोप लावून घराची शोभा वाढवण्यासोबतच घरात गारवा राखण्यास आणि हवा शुद्ध होण्यास मदत होऊ शकते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com