
विषारी कोब्राने पाठलाग करत घरात घुसून केला तरूणावर हल्ला; थरारक CCTV Footage Viral
साप पाहिला की आपल्या अंगावर काटा येतो. पण एखाद्या वेळी सापाने आपल्यावर हल्ला केला तर? आपल्या पायाखालची जमीन सरकेल. सध्या एका सापाचा व्हिडिओ व्हायरल झाला असून साप एका व्यक्तीवर हल्ला करताना दिसत आहे. त्यानंतर या व्यक्तीने सापाला हवाई सफर घडवली असल्याचं व्हिडिओमध्ये दिसत आहे. सदर घटनेचे सीसीटीव्ही फुटेज सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
सीसीटीव्ही फुटेजमध्ये एक साप घरात घुसताना दिसत आहे. घरात मऊ फरशी असल्यामुळे सापाला वेगाने पुढे जाता येत नाही. तर तो एका व्यक्तीवर हल्ला करताना दिसत आहे. पण समोरच्या व्यक्तीने शक्कल लढवत अंगावरचं शर्ट काढलं आणि त्याची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर सापाची शेपटी धरून त्याला गोलगोल फिरवलं. हा व्हिडिओ पाहताना आपल्या अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही. या व्यक्तीची हिंमत पाहून तुम्हालाही धक्का बसेल.
दरम्यान, सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओला नेटकऱ्यांकडून पसंती मिळत असून अनेकांनी हा व्हिडिओ शेअर केलाय. या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या असून लाईक केलं आहे. सोशल मीडियावर व्हायरल होणारे व्हिडिओ आपल्याला खूप काही शिकवून जात असतात.
सोशल मीडियावर अनेक मजेशीर व्हिडिओ व्हायरल होत असतात. त्यामध्ये विनोदी व्हिडिओ, डान्स व्हिडिओ, लग्नातील व्हिडिओ अशा वेगवेगळ्या प्रकारच्या व्हिडिओचा सामावेश असतो. सध्या सोशल मीडिया हे तरूणांच्या मनोरंजनाचे साधन बनले आहे.