

Foreign Tourist Followed to Train Bathroom in India; Shocking Video Goes Viral
esakal
जोधपूर येथून निघालेल्या एका ट्रेनमध्ये पोर्तुगीज पर्यटक आणि व्लॉगर इनेस फारिया यांना एक अस्वस्थ करणारी घटना घडली. तिने आपल्या इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या व्हिडिओतून ही बाब उघडकीस आणली आहे. ३ एसी कोचमध्ये प्रवास करत असताना ती आणि तिची मैत्रीण यांना समोर बसलेल्या काही तरुणांच्या वर्तणुकीमुळे असुरक्षित वाटू लागले होते. ते सतत त्यांच्याकडे टक लावून पाहत होते. जागा बदलत होते. यामुळे दोघींनाही अस्वस्थ वाटले.