
पुणे शहर नेहमीच आपल्या सांस्कृतिक आणि सामाजिक वैशिष्ट्यांसाठी ओळखले जाते. पण यावेळी पुण्याने एक असा अनमोल ठेवा जगासमोर आणला आहे, जो प्रत्येकाच्या मनाला भुरळ घालतोय. गुरुवार पेठेत राहणाऱ्या ९८ वर्षीय इंदुबाई जयसिंगराव खराडे यांचा हॉटेलमध्ये जेवतानाचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडिओने आतापर्यंत २ मिलियनहून अधिक लोकांचे लक्ष वेधले आहे आणि त्यावर सकारात्मक प्रतिक्रिया येत आहेत.