
पुण्यातील कोथरूड परिसरात पुणे महानगरपालिकेच्या ढिसाळ कारभाराचा आणखी एक नमुना समोर आला आहे. येथील रस्त्याच्या खराब दुरुस्तीमुळे रस्ता खचला आणि एक संपूर्ण ट्रक खड्ड्यात अडकला. हा धक्कादायक प्रकार सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. या घटनेमुळे कोथरूडमधील रस्त्यांच्या दुरवस्थेचा आणि महापालिकेच्या बेजबाबदार वृत्तीचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.