
सध्या सोशल मीडियावर व्हायरल होण्यासाठी लोक कोणत्याही थराला जाऊ शकतात, आणि पुण्यातही याचे अनेक पुरावे समोर येत आहेत. पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड (PMPML) च्या बसेसना अडवून इंस्टाग्राम रील्स बनवण्याचे प्रकार सध्या शहरात चर्चेचा विषय ठरत आहेत. अशाच एका व्हायरल व्हिडिओने पुणेकरांचे लक्ष वेधले आहे, ज्यामध्ये एक व्यक्ती रस्त्याच्या मधोमध बसून PMPL बस अडवताना दिसत आहे. हा व्हिडिओ पाहून काहींना हसू येत आहे, तर काहींना संताप येत आहे.