Rahul Gandhi : मोदींच्या नावे घोषणा देणाऱ्यांना राहुल गांधींकडून प्लाइंग किस; पाहा Viral Video | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

rahul gandhi flying kiss to bjp narendra modi supporter slogans were raised video viral

Rahul Gandhi : मोदींच्या नावे घोषणा देणाऱ्यांना राहुल गांधींकडून प्लाइंग किस; पाहा Viral Video

राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली भारत जोडो यात्रा सध्या राजस्थानमध्ये पोहोचली आहे. दरम्यान, राहुल गांधींचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये भाजपचे काही समर्थक राहुल गांधींच्या दौऱ्यात मोदी मोदीचा घोषणा देत आहेत, तर राहुल गांधींनी या घोषणा देणाऱ्या कार्यकर्त्यांना फ्लाइंग किस देताना दिसत आहेत. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओवर लोकांनी अनेक कमेंट्स केल्या आहेत.

राहुल गांधी यांनी फ्लाइंग किस केले

सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये राहुल गांधी आपल्या कार्यकर्ते आणि नेत्यांसह यात्रेत चालताना दिसत आहेत दरम्यान, रस्त्याच्या कडेला उभे असलेले काही भाजप समर्थक मोदी-मोदीच्या घोषणा देऊ लागले. यावर रागावण्याऐवजी राहुल गांधी समर्थकांना फ्लाइंग किस देऊ लागले.

हेही वाचा - First Paralympic Winner : मुरलीकांत पेटकर सांगतायत अपंग खेळाडूंसमोरील आव्हाने

हेही वाचा: मोदींचं कॉंग्रेसबद्दल विधान अन् शरद पवारांच्या डोळ्यात पाणी; आव्हाडांनी सांगितला किस्सा

पत्रकार अमन चोप्रा यांनी हा व्हिडीओ आपल्या सोशल मीडिया हँडलवरून शेअर केला आहे. त्यांनी लिहिले की भारत जोडो यात्रा, याला उत्तर देताना काँग्रेसच्या प्रवक्त्या सुप्रिया श्रीनेत यांनी ‘द्वेषाला फक्त प्रेम हेच उत्तर आहे, तुम्हीही या तुम्हीही बदलून जाल’, अशी कमेंट केली आहे.

हेही वाचा: PM मोदींचं मतदान ठरलं चर्चेचा विषय; भन्नाट Viral Memes एकदा पाहाच

या व्हिडिओवर कॉंग्रेस-भाजप दोन्ही पक्षांकडून कमेंट केल्या जात आहेत. एका युजरने जर असा प्रकार मोदींच्या रॅलीमध्ये घडला असता, लोकांनी राहुल-राहुल किंवा दुसरा कुठला झेंड दाखवला असता तर बुल्डोजर पोहचले असते. राहुल गांधी पुन्हा तोच भारतभर प्रेमाचा संदेश घेऊन निघाले आहेत. लोकांच्या मनातून भीती काढून टाकण्यासाठी ते निघाले आहेत असं म्हटले आहे.