
छत्रपती शिवाजी महाराजांचं दूरदृष्टी आणि तंत्रकुशलतेचं आणखी एक उदाहरण समोर आलं आहे. रायगड किल्ल्यावर ४०० वर्षांपूर्वी तयार करण्यात आलेलं मिनरल वॉटर फिल्टर आजही सर्वांना थक्क करत आहे. प्रवीण डोके यांनी काढलेला एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यामध्ये या अनोख्या जलशुद्धीकरण यंत्रणेची माहिती समोर आली आहे.