
सुरत, गुजरात येथील राजू भाट यांनी साध्या तुटलेल्या दगडावर संगीत वाजवून आणि गाणे गाऊन संपूर्ण देशाचे लक्ष वेधले आहे. सामान्यतः व्यावसायिक गायक महागड्या वाद्यांवर गाणे गातात आणि व्हायरल होण्यास वेळ लागतो, पण राजू यांनी हे सर्व गृहीतक खोटे ठरवले. त्यांच्या एका व्हिडिओने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला असून, तो १४.६ कोटींहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. राजू भाट, ज्यांना “राजू कलाकार” म्हणूनही ओळखले जाते.