
Rapido Driver Slaps Woman in Bengaluru Jayanagar: सध्या बऱ्यापैकी शहरांमध्ये दीर्घकाळ चालू असलेल्या रस्त्याच्या कामांमुळे, संततधार पडत असलेल्या पावसामुळे अनेकजण लवकरात लवकर कामाच्या ठीकाणी पोहोचण्यासाठी कॅब सेवांचा वापर करत असतात. परंतु बऱ्याचदा आपण या सेवांच्या चालकांमध्ये आणि प्रवाशांमध्ये हुजत झालेली दिसते. असाच बंगळुरूमधील एक प्रकार सध्या सोशम मीडियावर खूप व्हायरल होत आहे.
बंगळुरूमधील जयनगर परिसरात रॅपिडो चालकाने महिला प्रवाशावर हात उचलल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून, संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
चालकाच्या बेधडक आणि धोकादायक गाडी चालवण्याविरोधात आवाज उठवल्यानंतर हा प्रकार घडल्याची माहिती पोलिसांनी दिली.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित महिला प्रवासादरम्यान मध्येच बाईकवरून उतरली होती आणि चालकाच्या बेपर्वाईबद्दल तिने तक्रार केली होती. यावरून दोघांमध्ये वाद सुरू झाला. महिलेला फक्त इंग्रजी बोलता येत होते तर चालकाला फक्त कन्नड समजत होते. त्यामुळे दोघांमध्ये योग्य संवाद झाला नाही. परिणामी गैरसमज निर्माण झाले.
तसेच महिलेने चालकाला हेल्मेट परत न करण्यास आणि भाडं भरण्यास नकार दिला. त्यामुळे वाद अजून वाढला. यामुळे संत्पत झालेल्या चालकाने डायरेक्ट महिलेच्या कानाखाली मारली ज्यामुळे ती जोरात जमिनीवर पडताना दिसत आहे.
हा संपूर्ण प्रकार तिथल्या एका प्रत्यक्षदर्शीने मोबाईलमध्ये शूट केला. पण तिथे उभ्या असलेल्या कोणत्याही माणसाने हस्तक्षेप केला नसल्याचे या व्हिडिओमध्ये दिसून येत आहे.
तसेच महिलेने चालकाला हेल्मेट परत न करण्यास आणि भाडं भरण्यास नकार दिला. त्यामुळे वाद अजून वाढला. यामुळे संत्पत झालेल्या चालकाने डायरेक्ट महिलेच्या कानाखाली मारली ज्यामुळे ती जोरात जमिनीवर पडताना दिसत आहे.
हा संपूर्ण प्रकार तिथल्या एका प्रत्यक्षदर्शीने मोबाईलमध्ये शूट केला. पण तिथे उभ्या असलेल्या कोणत्याही माणसाने हस्तक्षेप केला नसल्याचे या व्हिडिओमध्ये दिसून येत आहे.या प्रकरणी पोलिसांनी सुरुवातीला नॉन-कॉग्निझेबल रिपोर्ट (NCR) नोंदवला. मात्र, व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिस आता हा गुन्हा एफआयआरमध्ये रूपांतरित करण्याचा विचार करत आहेत.
सध्या जयनगर पोलिस ठाण्यातर्फे या प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे.
दरम्यान, याआधी सप्टेंबर 2024 मध्ये देखील अशीच घटना बंगळुरूमध्ये घडली होती. एका महिलेने ओला ऑटो बुक केल्यानंतर ती रद्द केल्याने चालकाने तिच्याशी वाद घातला होता आणि मारहाण केल्याचा आरोप होता. त्या व्हिडीओमध्ये तो चालक उद्धटपणे बोलताना दिसत होता. त्यानंतर त्याने तिचा फोन हिसकावण्याचा प्रयत्न केला आणि पोलिस स्टेशनला येण्याचा आग्रह केला. महिलेने नकार दिल्यानंतर तो घटनास्थळावरून निघून गेला. नंतर त्याला पोलिसांनी अटक केली होती.
या सतत घडणाऱ्या घटनांमुळे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.