Rashmi Thackeray: लखलखत्या अंबानींच्या कार्यक्रमात गाजली मराठमोळी पैठणी, रश्मी ठाकरेंनी लावली पैठणी नेसून हजेरी

अंबानी यांच्या घरी गुजरातमधील फेमस पारंपारिक ‘मामेरू’ कार्यक्रमात रश्मी ठाकरेंनी वेधलं सर्वांचे लक्ष
Rashmi Thackeray Paithani At Anant Ambani Radhika Mameru Function
Rashmi Thackeray Paithani At Anant Ambani Radhika Mameru Function

अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नसोहळ्याला सुरुवात झाली आहे. खरतर अंबानींच्या घरी लगीनघाई सुरू झाली असून 2 जुलैपासूनच विविध समारंभांना सुरुवात झाली आहे. अनंत आणि राधिका दोघेही 12 जुलैला लग्नगाठ बांधणार आहेत. त्यापूर्वी होणाऱ्या विधिंना सुरुवात झाली आहे. अंबानींचा बंगला अँटिलियावर पाहुण्यांची मंदियाळी पाहायला मिळात आहे. याच पाहुणे मंडळींमध्ये माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांनी सर्वांचे लक्ष वेधले आहे. या लगीनघाईत आता रश्मी ठाकरेंच्या साडीची चर्चा जोरदार रंगली आहे. (Rashmi Thackeray Paithani At Anant Ambani Radhika Mameru Function )

काल रात्री म्हणजेच बुधवारी 3 जुलै 2024 रोजी मुकेश अंबानी यांच्या घरी गुजरातमधील फेमस पारंपारिक कार्यक्रम ‘मामेरू’ पार पडला. या कार्यक्रमाचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. यातील एक फोटो सध्या चर्चेचा विषय बनला आहे. अंबानींच्या या सोहळ्यात रश्मी ठाकरे यांनी पैठणी नेसून ग्रँड एन्ट्री मारली होती.

Rashmi Thackeray Paithani At Anant Ambani Radhika Mameru Function
Nita Ambani: लाल भडक साडीत वरमाईचा तोरा! निता अंबानी यांनी नेसलेली साडी करतेय हिंदू धर्माचा प्रसार

या कार्यक्रमात महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे व त्यांचा मुलगा तेजस ठाकरे हे देखील पोहोचले होते. यावेळी रश्मी ठाकरे फुलांची डिझाईन असलेली केशरी रंगाची सुंदर मुनीया पैठणी नेसून आल्या होत्या. या पैठणीमध्ये रश्मी ठाकरे उठून दिसत होत्या.

Rashmi Thackeray Paithani At Anant Ambani Radhika Mameru Function
Nita Ambani : नीता अंबानींसाठी वाराणसीत तयार होतेय स्पेशल सोन्याची साडी, हातमागाला नीता यांनी दिली भेट

या साडीवर त्यांनी मराठमोळे दागिने परिधान न करता मल्टीकलर डायमंडमध्ये गुंफलेला भरगच्च गळा भरून नेकलेस परिधान केला होता. तसेच, हिरवी टिकली, ऑरेंज शेडमधील डार्क लिपस्टिक, आयशॅडो, ब्लश, आयलायनर आणि काजळ यासर्वात रश्मी ठाकरेंच सौंदर्य खुलून आलं होतं.

मिळालेल्या माहितीनुसार, रश्मि ठाकरेंना कांजीवरम साड्यांची आवड आहे. नीता मुकेश अंबानी सांस्कृतिक केंद्राचे उद्घाटन काही दिवसांपूर्वी पार पडलं. यावेळीही रश्मी ठाकरे यांनी मराठीबाण जपला होता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com