Ratan Tata Portrait : अनोखं प्रेम! ११००० हिऱ्यांपासून बनवलं रतन टाटांचं डोळे दिपवणारं चित्र! व्हायरल होतोय व्हिडीओ

Ratan Tata Portrait Viral Video : भारताचे प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांचे ९ ऑक्टोबर २०२४ रोजी निधन झाले. यानंतर जगभरातून त्यांना श्रद्धांजली वाहिली जात आहे.
Ratan Tata Diamond Portrait Video Viral
Ratan Tata Diamond Portrait Video Viral
Updated on

Ratan Tata Diamond Portrait Video Viral : भारताचे प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांचे ९ ऑक्टोबर २०२४ रोजी निधन झाले. भारतासोबतच संपूर्ण जगभरातून रतन टाटा यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. उद्योगपती, राजकारणी, क्रीडापडू, कलाकार आणि सामान्य माणसांपर्यंत अनेकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या संवेदना व्यक्त केल्या. इतकेच नाही तर शिवसेना पक्षाकडून रतन टाटा यांना देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कार 'भारत रत्न' देण्याची मागणी देखील करण्यात आली.

रतन टाटा यांचे नाव जगभरात सर्वाधिक दान करणाऱ्या उद्योगपतींच्या यादीत येते. ते त्यांच्या जगण्यातील साधेपणासाठी ओळखले जात होते. रतन टाटा यांचे चाहते जगभरात पसरले आहेत. अशाच एका चाहत्याने चक्क हिरे वापरून त्यांचे चित्र साकारले आहे.

Ratan Tata Diamond Portrait Video Viral
Ratan Tata: आंबेगाव तालुक्यातल्या तरुणाने बनवलेल्या मशरूम सूपचे फॅन होते रतन टाटा! दर शनिवारी ब्रेकफास्टला...

रतन टाटा यांना देशभरातून वेगवेगळ्या स्वरूपात श्रद्धांजली दिली जात आहे. यातच सूरत मधील एका व्यापाऱ्याने रतन टाटा यांचे चित्र ११००० हिरे वापरून तयार केले आहे. या अनोख्या कलाकृतीचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला असून यावर लोक भरभरून कमेंट्स करत आहेत. अनेकांनी या व्यापाऱ्याचे कौतुक केले आहे. हा व्हिडीओ वेगाने सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Ratan Tata Diamond Portrait Video Viral
अमिताभ किंवा सिमी गरेवाल नाही तर महाभारतातील 'हा' अभिनेता होता रतन टाटा यांचा जवळचा मित्र; एकाच हॉस्टेलमध्ये राहायचे दोघे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com