
नवी दिल्लीः महिन्याचा टर्नओव्हर शंभर कोटी रुपयांपेक्षा जास्त, सहा लाख रुपये जीएसटी, अनेक महागड्या गाड्या अन् एका स्पीचसाठी २५ हजार रुपये फी; हे दावे आहेत व्हायरल रवी शर्मांचे. इतकं सगळं कमावल्याचा दावा करणाऱ्या रवी शर्मा यांचे आणखी काही स्वप्न आहेत. म्हणे त्यांना अजून एक रोल्स रॉयस गाडी खरेदी करायची आहे. अशा प्रकारचे दावे करणारा आणि स्वप्न दाखवणारा व्यक्ती नेटवर्क मार्केटिंग करणारा असतो, हा इतिहास आहे.