
पाकिस्तानमधील एका जोडप्याची अनोखी प्रेमकथा सध्या सोशल मीडियावर खूपच चर्चेत आहे. एका श्रीमंत घराण्यातील मुलीला तिच्या घरी काम करणाऱ्या ड्रायव्हरशी प्रेम झाले आणि तिने थेट त्याच्याशी लग्न केले. ही कहाणी इतकी रोमांचक आहे की, यूट्यूबर सैयद बासित अली यांच्या मुलाखतीनंतर ती व्हायरल झाली आहे. या प्रेमकथेने नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.