#RIPTwitter : ट्विटर संपणार? यूजर्सकडून श्रद्धांजली; सोशल मीडियावर भन्नाट मीम्स व्हायरल

rip twitter trends as employees resign in hundreds after elon musk ultimatum trending memes viral
rip twitter trends as employees resign in hundreds after elon musk ultimatum trending memes viral

जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक इलॉन मस्क यांनी ट्विटर या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मची सूत्रे हाती घेतली, तेव्हापासून ट्विटर वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत आहे. मोठ्या संख्येने कर्मचार्‍यांना कामावरून काढून टाकून त्यांना जास्त तास काम करायला लावल्याबद्दलही टीका होत आहे. आता शुक्रवारी ट्विटरवर एक हॅशटॅग ट्रेंड होत आहे, ज्यामध्ये #RIPTwitter असे लिहिले आहे.

#RIPTwitter च्या माध्यमातून सोशल मीडिया यूजर्स वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. काही ट्विटमध्ये अनेक कर्मचाऱ्यांनी आपल्या समस्या सांगितल्या आहेत. याशिवाय, #RIPTwitter हॅशटॅगसह, लोक मजेदार पद्धतीने बरेच मीम्स शेअर करत आहेत. स्वत: ट्विटरचे बॉस मस्क यांनीही एक मीम शेअर केली आहे, ज्यामध्ये 'ट्विटरची कबर' दिसत आहे.

बुधवारी इलॉन मस्क यांनी रात्री उशिरा कंपनीच्या कर्मचाऱ्यांना ईमेल पाठवला. ज्यामध्ये त्यांना कंपनीत काम करायचे असेल तर त्यांना अनेक तास वेगाने काम करावे लागेल, असे सांगण्यात आले होते. ज्यांना ट्विटरवर राहायचे आहे त्यांनी एक दिवस (गुरुवारी संध्याकाळी 5 वाजता) वेळ देण्यात आला होता, अन्यथा त्यांना 3 महिन्यांचा पगार मिळेल आणि त्यांना काढून टाकले जाईल, असे सांगण्यात आले होते.

इलॉन मस्कचे मालक झाल्यानंतर ट्विटरवर सातत्याने कर्मचारी नोकरीचे राजीनामे देत आहेत आहेत. तर काही कर्मचाऱ्यांना इलॉन मस्क यांनी स्वतःहून काढून टाकले आहे. दरम्यान नोकरी सोडलेल्या कर्मचाऱ्यांमध्ये अनेक अभियंते आणि विकासकांचा समावेश आहे, ट्वीटरवर #RIPTwitter, #TwitterDown, #WeMetOnTwitter, #TwitterDown आणि Twitter 2.0 वर ट्रेंड करत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com