

केरळच्या पठनमथिट्टा जिल्ह्यातील पल्लिक्कल या गावात एक अनोखी तक्रार समोर आली आहे. इतर वाद संपत्ती, राजकारण किंवा वैयक्तिक कारणांमुळे होतात, पण इथे वादाचा विषय कोंबड्याच्या आरडाओरडाशी संबंधित आहे! राधाकृष्ण कुरुप नावाच्या वृद्ध व्यक्तीला झोपेची समस्या निर्माण झाली होती.
कारण दररोज पहाटे ३ वाजता त्याच्या शेजाऱ्याचा कोंबडा जोरजोराने आरडाओरडा करायचा. हा त्रास असह्य झाल्याने त्यांनी प्रशासनाकडे धाव घेतली आणि अधिकृत तक्रार दाखल केली.