
क्रिमियातील तायगन सफारी पार्कमध्ये एका रशियन व्यावसायिक बॉक्सरच्या कृत्याने प्राणीप्रेमी आणि सामान्य जनतेत संतापाची लाट पसरली आहे. 24 वर्षीय अनास्तासिया लुचकिना हिने पार्कमधील गोरीलाला व्हेप (Electronic cigarette) देऊन त्याचा धूर ओढायला लावल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या घटनेने प्राणी कल्याणाच्या मुद्द्यावर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे.