
Sambhaji nagar video viral: छत्रपती संभाजी नगर इथल्या गोपिका ज्वेलरीचा एक व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. व्हिडीओमध्ये एक आजोबा आपल्या पत्नीसाठी ज्वेलरी घेत आहेत. आजीने एक माळ आणि मंगळसुत्राच्या वाट्या खरेदी केल्या. पैसे देताना मात्र दुकान मालकाने केवळ २० रुपये घेतले आणि त्यांचे आशीर्वाद घेतले. हा व्हिडीओ सोशल मीडियात तुफान व्हायरल झाला आहे. सगळेजण दुकान मालकाचं कौतुक करीत आहेत.