
Video : लोकशाही असूनही मास्तर मला पायदळी तुडवतात; चिमुकल्याचं भाषण तुफान Viral
आपण लहान असताना शाळेत अनेक भाषणं केली असतील. भाषणं पाठ केल्यानंतर व्यासपीठावर गेल्यावर अनेकजण ती भाषणं विसरत असतात. तर त्यामुळे अख्ख्या विद्यार्थ्यांमध्ये हशा पिकतो. पण सध्या एका चिमुकल्याचं भाषण व्हायरल होत असून त्याने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.
हेही वाचा - ....इथं तयार होतो आपला लाडका तिरंगा
प्रजासत्ताक दिनादिवशी आयोजित केलेल्या ध्वजारोहणाच्या कार्यक्रमात त्याने हे भाषण केले आहे. भारतात आजच्या दिवसापासून लोकशाही लागू झाली असं म्हणत त्याने भाषणाला सुरूवात केली आणि समोर बसलेले शिक्षक अक्षरश: लोळू लोळू हसले.
"लोकशाही असल्यामुळे मी खेळतो, मोक्कार धिंगाणा करतो, माकडासारखा झाडावर चढतो तर लोकशाही असल्यामुळे मला माझे वडील काहीच बोलत नाहीत. पण काही मुलं माझं नाव शाळेतील सरांना सांगतात आणि काही जण जसं लोकशाहीला पायदळी तुडवतात तसंच सर देखील मला पायदळी तुडवतात. पण मी खूप गरिब आहे, माझ्याएवढा गरिब अख्ख्या तालुक्यात कुणीच नसेल" अशा शब्दांत भाषण करत त्याने अक्षरश: प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.
दरम्यान, या चिमुकल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला असून अनेकांनी त्याच्या या भाषणावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. तर हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर अनेकांनी शेअर केला आहे.