शेतकऱ्याने गाय विकली, कुत्र्याने 7 किमीपर्यंत केला पाठलाग; काळजाला हात घालणारा Video | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video

शेतकऱ्याने गाय विकली, कुत्र्याने 7 किमीपर्यंत केला पाठलाग; काळजाला हात घालणारा Video

नातं किती निखळ आणि मनाला भावणारं असावं? आपण आपल्या आयुष्यात असे अनेक अतूट नातेसंबंध आपण पाहिले असतील पण प्राण्यांमधील अतूट नात्याचा व्हिडिओ आपण प्रथमच पाहत असाल. सध्या एका गायीचा आणि कुत्र्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून आपल्याही डोळ्यात पाणी येईल.

दरम्यान, एका शेतकऱ्याने गाय विकली असून ज्यांनी ही गाय विकत घेतली आहे ते गायीला टेम्पोत घालून घेऊन जात आहेत. पण ज्या शेतकऱ्याची गाय होती त्या शेतकऱ्याच्या कुत्र्याने या टेम्पोचा जवळपास सात किलोमीटर पाठलाग केला. ज्यावेळी टेम्पो थांबला त्यावेळी कुत्र्याने टेम्पोत झेप घेण्याचा प्रयत्न केला आणि अखेर टेम्पोत गेला. त्यानंतर गायीने या कुत्र्याला तोंडाने गोंजारल्याचं दिसत आहे. त्यानंतर सदर व्यक्तीने ही गाय शेतकऱ्याला परत केल्याची माहिती आहे.

काळजाला हात घालणारा हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. तर शेतकऱ्यांच्या डोळ्यात हा व्हिडिओ पाहून पाणी आल्याशिवाय राहणार नाही. आपण पाळलेल्या प्राण्यांच्या प्रेमाचं अतूट नातं शेतकऱ्यांनी जवळून पाहिलेलं असतं पण या कुत्र्याचं आणि गायीच्या अतूट नात्याचं दर्शन या व्हिडिओमुळे नेटकऱ्यांना झालं आहे. अखेर या नात्याचा विजय झाला.

दरम्यान, सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओला नेटकऱ्यांकडून पसंती मिळत असून अनेकांनी हा व्हिडिओ शेअर केलाय. या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या असून लाईक केलं आहे. सोशल मीडियावर व्हायरल होणारे व्हिडिओ आपल्याला खूप काही शिकवून जात असतात.

सोशल मीडियावर अनेक मजेशीर व्हिडिओ व्हायरल होत असतात. त्यामध्ये विनोदी व्हिडिओ, डान्स व्हिडिओ, लग्नातील व्हिडिओ अशा वेगवेगळ्या प्रकारच्या व्हिडिओचा सामावेश असतो. सध्या सोशल मीडिया हे तरूणांच्या मनोरंजनाचे साधन बनले आहे.