Video : पारंपारिक पद्धतीने पार पडला कुत्र्यांचा विवाह; कन्यादान करणारे ढसाढसा रडले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Dog Marriage

Video : पारंपारिक पद्धतीने पार पडला कुत्र्यांचा विवाह; कन्यादान करणारे ढसाढसा रडले

गुरूग्राम : हरियाणातील गुरूग्राम येथील एका जोडप्याने आपल्या कुत्र्याचा शेजाऱ्याच्या कुत्रीशी विवाह केल्याची घटना घडली आहे. हा विवाह सोहळा पारंपारिक विवाह पद्धतीने पार पडला असून त्यामध्ये सात फेऱ्यांचाही सामावेश आहे. या विवाह सोहळ्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

(Two Dog Marriage Viral Video)

हेही वाचा - मामाच्या जमिनीवरून सावकाराला पळविणारा 'डेबू' कसा बनला गाडगेबाबा.....

विवाह केलेल्या कुत्र्यांचे नाव स्विटी आणि शेरू असल्याची माहिती असून या विवाहासाठी हळदी समारंभाचेही आयोजन केलं होतं. आज सकाळी त्यांचा विवाह पार पडल्याची माहिती आहे. तर या विवाहासाठी सर्व तयारी केली असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे. या विवाहासाठी १०० निमंत्रण पत्रिका छापण्यात आल्या होत्या. त्या पत्रिका गावातील लोकांना आणि शेजाऱ्यांना वाटल्याची माहिती आयोजकांनी दिली.

व्हिडिओ पाहा

हेही वाचा: Asaram Bapu: जेलमध्ये बापूचं दहावं वर्ष; भक्त म्हणतायेत 'आता तरी सोडा'

त्याचबरोबर यासाठी ढोल ताशाचेही नियोजन केले होते. लग्नावेळी वरात काढण्यात आली असून अनेकजण वरातीत नाचत असताना या व्हिडिओत दिसत आहे. तर हा लग्न सोहळा सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

"आम्ही प्राणी प्रेमी आहोत. माझे पती एकदा मंदिरात जात असताना त्यांना एका कुत्र्याच्या पिल्ल्याने फॉलो केलं अन् त्यानंतर ते त्या पिल्ल्याला घरी घेऊन आले. त्यानंतर आम्ही त्यांना सांभाळलंय या गोष्टीला आता तीन वर्षे झाले असून तिचं नाव आम्ही स्विटी ठेवलं. स्विटीचा विवाह सोहळा आता पार पडत आहे" असं नवरी असलेल्या कुत्रीच्या मालकीण सविता यांनी सांगितलं.