
Viral Video : सावधान! विक्रेत्याकडून ग्राहकाला असा लावला जातो 'चुना'
आपण बाजारात अनेकवेळा गेला असाल आणि भाजीपाला किंवा फळे खरेदी करून आणले असतील. अनेकदा आपण एखादी २० रूपयांची वस्तू १५ रूपयांमध्ये खरेदी केली असेल पण अनेकदा आपली फसवणूकही झाली असेल. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत असून त्यामध्ये ग्राहकाची फसवणूक होताना दिसत आहे.
हेही वाचा - 'पठाण'..आणि २०२३ मधले बाॅलीवूड..कसे असतील दिवस
सदर व्हिडिओमध्ये एक ग्राहक महिला विक्रेत्याकडून फळे विकत घेताना दिसत आहे. पिशवीत फळे भरत असताना विक्रेती महिला पिशवी बदलते आणि खराब फळे असलेली पिशवी ग्राहकाला देते. हे करत असताना ग्राहकाला चाहूलदेखील लागली नाही. तर हा व्हिडिओ सोशल मीडियावर अनेकांनी शेअर केला आहे.
दरम्यान, कोणतीही खरेदी करताना प्रत्येक ग्राहकाने सतर्क राहिले पाहिजे. तर आपल्यासोबतही अशी फसवणूक होऊ शकते. हा व्हिडिओ ट्वीटरवर शेअर करण्यात आला असून त्यावर अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.