Video : खतम! बिअरचोरीचं मिशन फेल; न पिताच गडी घसरला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Viral Video

Video : खतम! बिअरचोरीचं मिशन फेल; न पिताच गडी घसरला

चोर कुठं आणि कशी चोरी करण्याचा प्रयत्न करेल त्याचा नेम नसतो. त्याला फक्त संधी मिळणे महत्त्वाचं असतं. मग तो सुटलाच म्हणायचं. सध्या एका चोराचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. एका शॉपिंग मॉलमधील हा व्हिडिओ असल्याचं प्राथमिक दृष्ट्या समोर आलं आहे.

(Beer Bottle Thief Viral Video)

व्हायरल होत असलेला व्हिडिओ हा सीसीटीव्ही फुटेज असून यामध्ये दोन तरूण मॉलमध्ये बिअरची बाटलीची चोरी करत आहेत. त्यातील एक तरूण पँटमध्ये बाटली ठेवण्याचा प्रयत्न करतो पण बाटली पँटमधून खाली पडते व फुटते. त्यानंतर तो ती बाटली रॅकच्या खाली टाकण्याचा प्रयत्न करतो पण बिअर फुटल्याने फरशी ओली झाल्यामुळे तोही त्यावरून खाली पडतो.

दरम्यान, हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडिओ असून खूप जणांना शेअर केला आहे. तर यावर नेटकऱ्यांच्या अनेक मजेशीर प्रतिक्रिया येत आहेत. सोशल मीडियावर असे अनेक मजेशीर व्हिडिओ व्हायरल होत असतात. सोशल मीडियावरील या व्हिडिओमुळे मनोरंजन होत असते. तर व्हायरल झालेले अनेक व्हिडिओ आपल्याला खूप काही शिकवून जातात.

टॅग्स :thiefbeerviral video