Viral Video: पाय न टेकवता पठ्ठ्याने ठेवली सायकल उभी; याचा बॅलन्स एकदा बघाच | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Viral Video

Viral Video: पाय न टेकवता पठ्ठ्याने ठेवली सायकल उभी; याचा बॅलन्स एकदा बघाच

लहानपणी शाळेत असताना स्लो सायकल चालवण्याच्या स्पर्धा आपण खेळला असाल. तर या स्पर्धेमध्ये जो सर्वांत शेवटी रेस पूर्ण करेल तो विजयी ठरतो. एका जागेवर सायकल उभे करणे आपल्याला सहसा जमणार नाही पण एका शाळेतील पठ्ठ्याचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. त्याने एकाच जागेवर सायकल उभी ठेवली आहे.

(Slow cycle competition Viral Video)

दरम्यान, व्हायरल होत असलेला व्हिडिओ हा दक्षिण भारतातील एका शाळेतील असून शाळेत स्लो सायकलची स्पर्धा असल्याची व्हिडिओतून दिसत आहे. तर या विद्यार्थ्याने एकाच जागेवर सायकल उभी करू ठेवलीये. त्याचा बॅलन्स पाहून तुम्हीही थक्क झाल्याशिवाय राहणार नाही. तर हा व्हिडिओ सध्या अनेकांकडून शेअर केला जात आहे.

तर असं बॅलन्स करणे प्रत्येकाला जमत नाही. काही विद्यार्थ्यामध्ये असं टॅलेंट असतं. हा व्हिडिओ सध्या प्रचंड व्हायरल होत असून अनेकजणांनी यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. तर या व्हिडिओला १ लाख २५ हजारांपर्यंत लाईक्सचा पाऊस पडला आहे.

टॅग्स :bicyclesviral video