

Afghanistan’s Ghazni somnath temple
esakal
Somnath Temple: एक हिंदू मंदिर लुटून अफगाणिस्तानातलं गझनी शहर एवढं श्रीमंत झालं की जागतिक स्तरावरचं एक श्रीमंतीचं केंद्र बनलं. महमूद गझनीने १०२५-२६ मध्ये म्हणजे एक हजार वर्षांपूर्वी सोमनाथ मंदिरात विध्वंस करुन हजारो किलो सोनं लुटून नेलं.. हजारो लोक मृत्यूमुखी पडले. त्यानंतरही सोमनाथ मंदिर अनेक आक्रमकांनी लुटलं. परंतु मंदिर पुन्हा-पुन्हा उभं राहिलं. यंदा सोमनाथ मंदिरावरील गझनीच्या आक्रमणाला एक हजार वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त आयोजित स्वाभिमान पर्व कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार आहेत.