Missing Man : घरच्यांना वाटलं देवाघरी गेला, 5 महिन्यांनी पोरगं सापडलं मोमोच्या स्टॉलवर

momo missing man
momo missing manesakal
Updated on

पटना : ज्या मुलाला परिवाराने मृत्यू झाला म्हणून सोडून दिलं होतं तो मुलगा तब्बल पाच महिन्यानंतर सापडला आहे. ही घटना बिहार राज्यातील भागलपूर येथे घडली आहे. दिल्लीजवळील नोएडा येथे सदर मुलगा मोमोज खाताना आढळला आहे.

अधिक माहितीनुसार, निशांत कुमार असं हरवलेल्या मुलाचं नाव असून तो ३१ जानेवारी २०२३ पासून हरवलेला होता. निशांतचे लग्न झालं असून तो हरवल्यानंतर त्याचा मेहुणा रविशंकर सिंह याने सुल्तानगंज पोलीस स्टेशनमध्ये हरवल्याची तक्रार दिली होती. पण निशांतच्या वडिलांनी त्यांच्या व्याहीवर म्हणजे निशांतच्या सासऱ्यावर आणि मेहुण्यावर त्याच्या अपहणाचा आरोप लावला होता.

momo missing man
Viral Video : आधी हरणाने खाल्ला साप, आत्ता जिराफ खातेय हाडं; अचानक शाकाहारी प्राणी मांसाहारी कसे बनले?

दरम्यान, पुढच्या पाच महिन्यापर्यंत निशांतचा शोध लागला नाही म्हणून त्याच्या कुटुंबियांनी त्याचा मृत्यू झाला म्हणून सोडून दिलं. पण पुढे हरवलेल्या निशांतचा मेहुणा रविशंकर नोएडा येथे गेला आणि एका दुकानावर त्याला एक भिकारी दिसला. त्यानंतर त्याने या भिकाऱ्याला मोमोज खायला दिले आणि त्याची विचारपूस केली. त्याने नाव, पत्ता सांगितल्यानंतर रविशंकरच्या पायाखालची जमीन सरकली. कारण जो भिकारी होता तोच हरवलेला रविशंकरचा मेहुणा निशांत कुमार होता.

momo missing man
Viral Video : गाय-बैलाची अनोखी लव स्टोरी; विकलेल्या गायीच्या पाठीमागे बैल धावला अन्...

या घटनेनंतर रविशंकर याने पोलीस स्टेशन गाठलं आणि घडलेली घटना सांगितली. दिल्ली पोलिसांनी निशांतला सुल्तानगंज पोलिसांकडे सुपूर्द केला. यानंतर आता त्याचे अपहरण कसे झाले होते यासंबंधित चौकशी केली जाणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com