

Sonal Shah’s Heartwarming Reaction to Maharashtra’s Ratha on Republic Day Goes Viral
sakal
Republic Day 2026: काल भारताचा ७७वा प्रजासत्ताक दिन साजरा झाला. दरवर्षी प्रमाणेच काल कर्तव्यपथावर वेगवेगळ्या राज्याचे आणि मंत्रालयांचे चित्ररथ सहभागी झाले होते. याच परेडमध्ये महाराष्ट्राचा चित्ररथ देखील सहभागी झाला होता. गणपतीची थीम असलेल्या या चित्ररथामधून महाराष्ट्रातील गणेशोत्सवाचं महत्त्व अधोरेखित करण्यात आलं होतं. गणपतीची सुंदर मूर्ती या रथावर दिसत होती. तर गणेशोस्तवासाठी तयार केल्या जाणाऱ्या गणेश मूर्तींबरोबरच अष्टविनायक या रथामधून दाखवण्यात आले होते. या चित्ररथाची सध्या सगळीकडेच चर्चा असतानाच दुसरीकडे चर्चा आहे ती केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांच्या पत्नीने हा चित्ररथ पाहिल्यानंतर केलेल्या कृतीची.