
Viral Video : पाण्याची किंमत कळाली पाहिजे! खारूताईचा पाण्यासाठी टाहो
पाणी हे जीवन आहे. पाण्याशिवाय माणूस जगू शकत नाही. जसं मानवाला जगण्यासाठी पाण्याची आवश्यकता असते. त्याचप्रकारे प्राण्यांनासुद्धा पाण्याची गरज असते. तर उन्हाळ्यात किंवा दुष्काळात अनेक प्राणी पाण्यावाचून मरतात.
सध्या एका खारूताईचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यामध्ये ती पाण्यासाठी टाहो फोडताना दिसत असून एका व्यक्तीकडे पाण्यासाठी पुढचे दोन्ही पाय उंचावत आहे. हा हृदयद्रावक व्हिडिओ पाहून आपणही थक्क व्हाल.
हेही वाचा - सूर्यकुमार...भारतीय क्रिकेट मधला 'लंबी रेस का...'
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती खारूताईला बाटलीने पाणी पाजत आहे. तहानलेली खार पाणी पिऊन तृप्त झाली असून त्यानंतर ती निघून गेली आहे. पाणी पाजल्यामुळे तिने मनातल्या मनात सदर व्यक्तीचे आभार मानले असतील.
दरम्यान, हा व्हिडिओ महंत आदित्यनाथ या ट्वीटर अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून यावर अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. तर १८ हजार लोकांनी या व्हिडिओला लाईक केलं आहे. सध्या सोशल मीडियावर अनेकांनी या व्हिडिओलो शेअर केलंय.