Viral : 'एवढा कॉन्फिडन्स पाहिजे आयुष्यात'; भाजप मंत्र्याने शेअर केला विद्यार्थ्याचा Video | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Student VIdeo

Viral : 'एवढा कॉन्फिडन्स पाहिजे आयुष्यात'; भाजप मंत्र्याने शेअर केला विद्यार्थ्याचा Video

नागालँड येथील भाजपचे मंत्री तेमजेन इमना अलाँग हे आपल्या सोशल मीडियावर चांगलेच अॅक्टिव्ह असतात. ते आपल्या ट्वीटर अकाउंटवरून अनेक मजेशीर किस्से किंवा फोटो शेअर करत असतात. त्यांनी शाळेतील एका मुलाचा व्हिडिओ आपल्या ट्वीटर अकाउंटवरून शेअर केला आहे.

हेही वाचा - भारतीयांनी जगाला डिजिटल पेमेंट शिकवायची आलीये वेळ...

तेमजेन यांनी शेअर केलेला व्हिडिओ नागालँड येथील एका शाळेतील विद्यार्थ्याचा आहे. ससुराली जाने हों हे गाणं विद्यार्थी वर्गात गात आहे. तर शिक्षकाने या विद्यार्थ्याचा व्हिडिओ शूट केला आहे. या मुलाचा स्वॅग आणि कॉन्फिडन्स पाहून तुम्हीही थक्क व्हाल. तर आयुष्यात एवढा कॉन्फिडन्स पाहिजे असं कॅप्शन टाकून मंत्री जेमजेन यांनी हा व्हिडिओ ट्वीटरवर पोस्ट केला आहे.

दरम्यान, "ज़िन्दगी जीने के लिए नज़रो की नहीं नज़ारो की ज़रूरत होती है !!" असंही त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये लिहिलं आहे. तर त्यांनी शेअर केलेला व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. तर अनेकांनी यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.