
Sudha Murty Advoice For Happy Married Life : देशातल्या उद्योजिकांपासून महाविद्यालयात शिकणाऱ्या तरूणींपर्यंत सगळ्यांसाठी प्रेरणास्थान असणाऱ्या उद्योजिका, लेखिका आणि प्रेरणास्रोत असणाऱ्या सुधा मूर्ती कायमच वेगवेगळ्या विषयांवर मार्गदर्शन करत असतात. त्यांच्या अनुभवी नजरेतून टिपल्या आणि मांडल्या जाणाऱ्या गोष्टी अनेकांसाठी दिशादर्शक ठरतात. सध्या त्यांचा असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे.
या व्हिडीओत एका मुलाखती दरम्यान त्या वेगवेगळ्या विषयांवर संवाद साधत देशातल्या तरूण-तरूणींना मार्गदर्शन करत असल्याचं दिसत आहे. त्यांच्या अनुभवातून जीवनाचं गुपीत उघड करणारा हा व्हिडीओ इंस्टाग्रामवर तरुणांकडून विशेष बघितला आणि लाइक केला जात आहे.
यात त्यांनी देशातल्या तरूणींना सुखी आयुष्यासाठी कानमंत्र दिला आहे. त्या म्हणतात, "जो माणूस तुमची काळजी करत नाही, तुम्ही कुठे आहात, कशा आहात, काय करत आहात याचा त्यांना फरक पडत नसेल; तर अशा व्यक्ती पेक्षा ज्यांना तुमची काळजी आहे, तुम्हाला काय आवडतं काय नाही याचा विचार करतात, तुम्हाला जपतात अशी व्यक्ती अधिक महत्वाची असते. आणि असावी."
"मुलाची श्रीमंती, त्याचा पगार, पद बघण्यापेक्षा त्याच्यातले हे गुण, समजुतदारपणा मुलींनी बघावा. याच गुणांवर मुलाला तपासावं आणि स्वीकारावं. तरच तुम्ही आयुष्यात सुखी राहू शकाल. तुमचं वैवाहिक आयुष्य आनंदमयी होऊ शकेल."
या व्हिडीओला तरूणांनी भरभरून प्रतिसाद दिला. काहींनी हार्ट टाकून प्रेम व्यक्त केलं आहे तर काहींनी या मोलाच्या मार्गदर्शनाबद्दल आभार मानले आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.