Pak Vs Eng: 'आम्ही हिशोब केल्याशिवाय….'; पराभवानंतर पाक पंतप्रधानांना भारताकडून चोख प्रत्युत्तर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

t20 world cup 2022 kjs dhillon responds on pakistan pm shehbaz sharif tweet goes viral rak94

Pak Vs Eng: 'आम्ही हिशोब केल्याशिवाय….'; पराभवानंतर पाक पंतप्रधानांना भारताकडून चोख प्रत्युत्तर

T20 World Cup Final : T20 विश्वचषक 2022 च्या फायनलमध्ये इंग्लंडने पाकिस्तानचा 5 गडी राखून पराभव केला. इंग्लडचा संघ दुसऱ्यांदा T20 विश्वचषक विजेता बनला आहे. यापूर्वी 2010 मध्ये इंग्लंड संघाने हे विजेतेपद पटकावले होते. 2010 साली इंग्लंड संघाने अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाचा पराभव करून विजेतेपद पटकावले होते. इंग्लंडला सामना जिंकण्यासाठी 138 धावांची गरज होती. जॉस बटलरच्या संघाने 19 षटकांत 5 गडी गमावून लक्ष्य गाठले. दरम्यान इंग्लंडच्या विजयाचा हिरो ठरला तो अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्स.

पाकचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांना प्रत्युत्तर

इंग्लंडच्या विजयावर आणि पाकिस्तानच्या पराभवावर सोशल मीडिया यूजर्स जबरजस्त प्रतिक्रिया देत आहेत, मात्र सोशल मीडियावर एक ट्विट मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेले हे ट्विट केजेएस ढिल्लन (KJS Dhillon) यांचे आहे. केजेएस ढिल्लन यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या ट्विटला प्रत्युत्तर दिले आहे. मात्र, हे ट्विट सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहे. सोशल मीडियावर भारतीय वापरकर्ते या ट्विटवर मोठ्या संख्येने प्रतिक्रिया देत आहेत.

हेही वाचा: Maharashtra Politics: …तर ते तुमच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवतील; लेकीला अनुसरून सुषमा अंधारेंची भावनिक पोस्ट

इंग्लंड संघ बनला चॅम्पियन

विशेष म्हणजे भारतीय संघाला उपांत्य फेरीच्या सामन्यात इंग्लंडविरुद्ध 10 विकेट्सने पराभव स्वीकारावा लागला होता. टीम इंडियाच्या या पराभवावर पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी टोमणा मारला होता. त्यांनी ट्विट करून भारतीय संघाची खिल्ली उडवली होती. आता KJS Dhillon यांनी उत्तर दिले आहे की "93000/0 अजूनही नाबाद जय हिंद". मात्र, हे ट्विट सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहे. या ट्विटवर भारतीय यूजर्स देखील चांगलीच मजा घेत आहेत. 1971 च्या युध्दात तब्बल 93,000 पाकीस्तानी सैन्याने भारतीय लष्करासमोर आत्मसमर्पण केले होते, त्यावरून भारतीय यूजर्स पाक पंतप्रधानांना ट्रोल करत आहेत.

हेही वाचा: Mohammed Shami : भावा ही कर्माची फळ; पाच शब्दात शमीने घेतली शोएब अख्तरची ‘विकेट‘