

A tigress enjoys playful moments with her cubs in the Karwa forest of Tadoba-Andhari Tiger Reserve in Chandrapur, Maharashtra. Wildlife photographer Jatin Patel captures the heartwarming scene during a jungle safari
esakal
चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात वाघिणीचा तिच्या बछड्यांसोबतचा एक मनमोहक क्षण कॅमेऱ्यात टिपण्यात आला आहे. कारवा जंगलात सफारीदरम्यान वन्यजीव छायाचित्रकार जतिन पटेल यांनी हे दृश्य आपल्या कॅमेऱ्यात अचूकपणे कैद केले. वाघिणीचा प्रेमळ अंदाज, बछड्यांची धमाल आणि त्यांच्यात सुरू असलेली खेळकर मस्ती सध्या वन्यजीवप्रेमींचे लक्ष वेधून घेत आहे. या छायाचित्रांचे आणि दृश्यांचे सोशल मीडियावर कौतुक होत आहे.