
रेल्वे प्रवासादरम्यान एका तृतीयपंथीने तिच्या सौंदर्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. गुलाबी साडीतील ही तृतीयपंथी प्रवाशांकडून पैसे गोळा करत असताना एका प्रवाशाने तिचा व्हिडिओ शूट केला. हा व्हिडिओ @classy_boy_sahil_2k या इंस्टाग्राम पेजवर शेअर होताच तो व्हायरल झाला. तब्बल ६.२५ कोटी लोकांनी हा व्हिडिओ पाहिला असून, तिच्या सौंदर्याची आणि आकर्षक हावभावाची सर्वत्र चर्चा होत आहे.