
मुंबईः खोदकामादरम्यान खजिना सापडल्याचं आपण नेहमी ऐकत असतो. अनेकदा घराचं काम सुरु असताना सोन्यांचा हंडा सापडतो तर कधी शेतामध्ये मौल्यवान दागिने सापडतात. बुऱ्हाणपूर येथे लोक आपल्या शेतात खोदकाम करत असल्याचा व्हिडीओ समोर आलेला आहे. दोन महिन्यांपूर्वी गावात सोन्याची नाणी सापडल्याचं लोक सांगतात. त्यामुळे हे खोदकाम सुरु झालं आहे. त्यातच छावा सिनेमामध्ये बुऱ्हाणपुरात मुघलांचा खजिना गडप झाल्याचं दाखवण्यात आलेलं आहे. त्यामुळे लोकांना येथे खजिना सापडण्याची आशा आहे.