Viral : मद्यधुंद ड्रायव्हरच्या ट्रकने कारला 3 किमी नेलं ओढत; Video पाहून थरकाप उडेल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video

Viral : मद्यधुंद ड्रायव्हरच्या ट्रकने कारला 3 किमी नेलं ओढत; Video पाहून थरकाप उडेल

मेरठ : उत्तरप्रदेशातील मेरठ येथे एका ट्रकने कारला ढकलत नेल्याची घटना घडली आहे. मद्यधुंद अवस्थेत असलेल्या ट्रक ड्रायव्हरने हे कृत्य केलं असून त्याने जवळपास तीन किलोमीटरपर्यंत ही कार झकलत नेली आहे. ही घटना कॅमेऱ्यात कैद झाली असून हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

हेही वाचा - अल्पमतातील निवाडे आणि सामान्य माणूस

स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, या ट्रकवाल्याने कारला बॉलिवूड चित्रपटात दाखवतात त्याप्रमाणे ओढत नेलं आहे. तर अनेकांनी त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला पण तो थांबला नाही. शेवटी पोलिसांनी सदर ट्रकला अडवत चालकाला अटक केली आहे. चालक मद्यधुंद अवस्थेत असल्याची माहीती पोलिसांनी दिली आहे.

दरम्यान, पोलिसांनी आरोपीचे वाहन ताब्यात घेतले असून त्यावर कारवाई केली आहे. तर अधिकचा तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

टॅग्स :accidentTruckviral video