

khade hanuman ujjain crane viral video
esakal
सिंहस्थ २०२८च्या पार्श्वभूमीवर उज्जैनमध्ये रस्ता रुंदीकरणाची कामे वेगाने सुरू आहेत. मात्र, सती गेट परिसरातील सुमारे १७० वर्षे जुन्या ‘खडे हनुमान’ मंदिरातील मारुतीरायांची मूर्ती हलवताना प्रशासनासमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. क्रेन आणि अवजड यंत्रसामग्रीच्या मदतीने दोन दिवस प्रयत्न करूनही मूर्ती जागची हलली नाही. त्यामुळे आता या मूर्तीची रचना आणि जमिनीखालील पायाचा वैज्ञानिक पद्धतीने अभ्यास करण्यासाठी IIT इंदूरच्या तज्ज्ञांची मदत घेण्यात आली आहे.
स्थानिक भाविकांसाठी ही घटना श्रद्धेचा विषय ठरली आहे. मात्र, पुरातत्त्व तज्ज्ञांच्या मते मूर्तीच्या रचनेमागे प्राचीन भारतीय दगडी बांधकाम तंत्रज्ञान असण्याची शक्यता आहे.