

viral fake meme photo about Altaf Shaikh, ICLS after UPSC result
esakal
केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC) निकालाने देशभरात खळबळ उडाली आहे. हजारो उमेदवारांच्या स्वप्नांना पंख फुटले तर काहींच्या आशा धुळीला मिळाल्या. पण या निकालानंतर सोशल मीडियावर जे काही घडत आहे ते पाहून सर्वांनाच धक्का बसतोय. इंस्टाग्राम आणि x वर (पूर्वीचे ट्विटर) मीम पेजेसनी यशस्वी उमेदवारांसाठी आनंदोत्सव साजरा केला जात आहे. मजेशीर मीम, व्हिडिओ आणि शुभेच्छांचा वर्षाव होत असताना दुसरीकडे मात्र खोट्या माहितीचा बाजार गरम झाला आहे. क्लास १ अधिकाऱ्यांच्या फोटोंचा गैरवापर करून अपप्रचार पसरवला जात असून यामुळे अनेकांच्या भावनांशी खेळ होत आहे.