मुलीचा मृत्यू झाला, अंत्यसंस्कारही झाले! त्यानंतर तिचाच वडिलांना Video Call आला अन्...; थरकाप उडवणारी घटना

हा प्रकार पाहून तिचे कुटुंबीय, पोलिस आणि गावकरीही चक्रावले आहेत.
crime News
crime NewsSakal

पटना : बिहार राज्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली असून मृत मुलीचे अंत्यसंस्कार केल्यानंतर काही दिवसांत त्याच मुलीचा आपल्या वडिलांना व्हिडिओ कॉल आला आहे. हा प्रकार पाहून तिचे कुटुंबीयांसहित पोलिस आणि पंचक्रोशीतील लोकंंही चक्रावले आहेत. व्हिडिओ कॉल करुन मी जिवंत असल्याचं तिने सांगितलं आणि सगळेच हादरुन गेले.

अधिक माहितीनुसार, पुर्णिया जिल्ह्यातील अकबरपुरमधील अंशु कुमारी ही तरुणी एका महिन्यापूर्वी अचानक गायब झाली होती. मुलगी गायब झाल्यानंतर तिच्या कुटुंबियांनी तिचा शोध घेतला मात्र मुलीचा तपास लागला नाही.

त्यानंतर तिच्या कुटुंबियांकडून पोलिसांमध्ये तक्रार दाखल करण्यात आली होती. काही दिवसानंतर स्थानिक पोलिसांना एका कालव्यामध्ये अज्ञात मुलीचा मृतदेह सापडला. पाण्यात बुडाल्यामुळे मृतदेह सुजला होता. मृतदेह कुणाचा आहे हे ओळखणे अशक्य होते.

अंशुच्या घरच्यांना याबाबतची माहिती दिल्यानंतर अंशूच्या कुटुंबियांनी कपड्याच्या आधारावर मृतदेह तिचाच असल्याचे सांगितले. यानंतर मुलीचा मृत्यू झाल्याचं समजत कुटुंबियांकडून तिचे अंत्यसंस्कारही करण्यात आले.

crime News
धरण उशाला कोरड घशाला! जायकवाडीच्या पायथ्याच्या गावात भरपावसाळ्यात टँकरने पाणीपुरवठा|Water Crisis

पण ज्या मुलीचे अंत्यसंस्कार केले होते त्याच मुलीचा काही दिवसानंतर अचानक व्हिडिओ कॉल आला. विनोद मंडल असं तिच्या वडिलांचं नाव असून व्हिडिओ कॉलनंतर सगळ्याच कुटुंबाचा थरकाप उडाला. फोनवरून तिने आपण जिवंत असल्याचं आपल्या वडिलांना सांगितलं.

"मी माझ्या प्रियकराशी लग्न करण्यासाठी घरातून पळून आले होते आणि सध्या पूर्णियाच्या बनमंखी ब्लॉकमधील जानकी नगर भागात आपल्या सासरच्या घरात राहत आहे" असं तिने आपल्या वडिलांना सांगितलं. त्यामुळे आपण मुलगी समजून दुसऱ्याच मुलीच्या मृतदेहाचे अंत्यसंस्कार केल्याचं कुटुंबियांच्या लक्षात आलं.

crime News
Marriage Fraud : सावधान! टोळी आलीय...; ‘ती’ 20 दिवस नांदली अन् रोकड, दुचाकी घेऊन साथीदारासह फरार झाली

दरम्यान, ज्या मृतदेहाचे आपण आपली मुलगी म्हणून अंत्यसंस्कार केले तो मृतदेह कुणाचा होता हा मोठा प्रश्न आता कुटुंबियांना आणि पोलिसांना पडला आहे. त्यामुळे पोलिसांनी या प्रकरणाचा नव्याने तपास सुरू केला आहे. पण ही मन सुन्न करणारी आणि तितकीच चक्रावून टाकणारी घटना वाचून तुमचाही थरकाप उडेल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com