

जीव लावल्यावर मुके प्राणीही जवळ येतात, जीव लावतात असं आपण अनेकदा ऐकलं असेल किंवा याचा अनुभव घेतला असेल. पाळीव प्राणी तर आपल्या मालकाबद्दल कृतज्ञता ठेवतातंच पण निसर्गातले प्राणी किंवा पक्षी एखाद्याला रोज भेटायला येतात आणि त्याने भरवलेले अन्न खातात असं चित्र खूप दुर्मिळ. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
(RJ Shonali And Sparrow Viral Video)
हेही वाचा - Gautami Patil- लावणीचा बाजच अश्लीलतेचा?
RJ शोनाली यांच्या इंस्टाग्रामवरून घेतलेला हा व्हिडिओ अभिजित भोसले यांच्या bhosale.ab या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आलाय. तर या व्हिडिओमध्ये एक चिमणी एका व्यक्तीच्या हातावर येऊन बसते आणि त्या व्यक्तीने भरवलेले अन्न खाते. तर व्हिडिओमध्ये न दिसणारी व्यक्ती चिमणीला गोड गोड बोलत आहे. चिमणीही हातावर खेळताना आपल्याला या व्हिडिओत दिसत असून हा व्हिडिओ पाहून आपल्यालाही समाधान वाटेल. तर हा व्हिडिओ RJ Shonali यांचा असल्याचं समजतंय. सोशल मीडियावर हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे.
दरम्यान, सोशल मीडिया प्लॅटफॉर्म हे मनोरंजनाचा साधन झाले असून त्यावर अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. तर हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडिओ असून खूप जणांनी शेअर केला आहे.
यावर नेटकऱ्यांच्या अनेक मजेशीर प्रतिक्रिया येत आहेत. सोशल मीडियावर असे अनेक मजेशीर व्हिडिओ व्हायरल होत असतात. तर व्हायरल झालेले अनेक व्हिडिओ आपल्याला मोठा धडा शिकवून जातात.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.