.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
व्हिएतनाममध्ये यागी चक्रिवादळामुळे हाहाकार उडाला असून आतापर्यंत येथे मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या 60च्या वर गेली आहे. सोमवारी सकाळी झालेल्या भुस्खलनाच्या घटनेत 20 लोकांना घेऊन जाणारी एक बस काओ बांग प्रांतात पूरात वाहून गेल्याचा धाक्कादायक प्रकार घडला. या भीषण चक्रीवादळादरम्यान आलेल्या पुरात येथील Phong Chau हा पुल देखील रेड नदीत वाहून गेला. या घटनेचा एक थरारक व्हिडीओ समोर आला आहे.