
एका लहान मुलाच्या मनात आपल्या काळजीवाहू दीदीबद्दल असलेलं प्रेम आणि तिच्या पाठवणीच्या वेळी त्याने व्यक्त केलेल्या भावना यांचा हृदयस्पर्शी व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ प्रत्येक त्या व्यक्तीच्या हृदयाला स्पर्श करतो, जी आपल्या मुलांना काळजी घेणाऱ्या दिदिच्या हवाली करून कामावर जाते. या व्हिडिओत दिसणारा छोटा नभ आणि त्याची प्रिय मुस्कान दीदी यांच्यातील बंध इतका घट्ट आहे की, त्यांची पाठवणी पाहून कोणाच्याही डोळ्यात पाणी येईल.