
ज्युलिया स्टीवर्ट यांनी अॅपलबाय कंपनीला नफ्यात आणले, पण सीईओ पद नाकारल्याने राजीनामा दिला.
त्यांनी IHOP मार्फत अॅपलबाय 2.3 अब्ज डॉलरला विकत घेतली आणि माजी बॉसला काढले.
त्यांची कहाणी मेहनत आणि आत्मविश्वासाने यश मिळवण्याची प्रेरणा देते.
जाभार एका ७० वर्षीय महिलेची कहाणी सध्या चर्चेचा विषय ठरली आहे. ज्युलिया स्टीवर्ट एक यशस्वी उद्योजिका यांनी आपल्या कर्तृत्वाने आणि धाडसाने सर्वांना शॉक केले आहे. ज्या कंपनीने तिला सीईओ पद नाकारले तीच कंपनी तिने विकत घेतली आणि आपल्या जुन्या बॉसला बाहेरचा रस्ता दाखवला. ही घटना एखाद्या चित्रपटासारखी वाटते.. ही गोष्ट नुकत्याच एका पॉडकास्टमधून समोर आली आहे.