Gold Plated Food Dish : अबब! रेस्टॉरंटमध्ये चक्क 1.3 कोटींच बिल; जेवणाऱ्यांनी लावला डोक्याला हात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Gold Plated Food Dish

Gold Plated Food Dish : अबब! रेस्टॉरंटमध्ये चक्क 1.3 कोटींच बिल; जेवणाऱ्यांनी लावला डोक्याला हात

Viral News: जर गोष्ट नवीन नवीन खाद्यपदार्थांच्या बाबत असेल तर फूडी लोकांना कोणीही अडवू शकत नाही; मग ते अगदी एका रस्त्यावर मिळणारी छोटीशी डिश असो वा फॅन्सी रेस्टॉरंटमधलं महागडं जेवण वा एखादी अनोखी डिश; त्यांना ते ट्राय करायचच असत. अशीच एक डिश सध्या चर्चेत आहे. चांदीच्या वर्खाची स्वीट डिश तुम्ही चाखली असेलच पण चक्क सोन्याने कोट केलेल एक प्रॉपर डिश याबद्दल ऐकल आहे का?

इन्स्टाग्रामवरील प्रसिद्ध शेफ सॉल्ट बे, सर्व स्टीक प्रेमींसाठी ही अनोखी डिश घेऊन आले आहेत. आणि हो आणि हो हे तुमच्या मानेवरच्या आणि मनगटावरच्या सोन्याशी अगदी तंतोतंत जुळते.

एका रेस्टॉरंटमध्ये 14 जणांच्या ग्रुपने जेवण केले. त्याचे बिल 1.3 कोटी रुपये आले. जेव्हा बिलाचा फोटो सोशल मीडियावर शेअर झाला तेव्हा लोकांना आश्चर्याचा धक्का बसला. नंतर तुर्कीचे शेफ Nusr-et Gokce यांनी यामागचे कारण स्पष्ट केले. Nusr-et Gokce ला Salt Bae म्हणून देखील ओळखले जाते. त्यांनी स्वत:च्या नावावर अनेक रेस्टॉरंट्स उघडली आहेत. अबू धाबीमधील नुसर-एट रेस्टॉरंटमधील जेवणाचे बिल 1.3 कोटी रुपये आले.

हेही वाचा: गरज आहे पंढरपूर पुन्हा समतेचे पीठ होण्याची....

नंतर शेफने त्यामागचे कारण सांगितले. खरंतर नुसर-एट रेस्टॉरंट हे अनोख्या 'गोल्ड कोटेड स्टीक'मुळे प्रसिद्ध आहे. Nusr-et Gokce यांनी एका पोस्टमध्ये सांगितले की, तेथे 24 कॅरेट सोन्याचे कॅरेट स्टीक सर्व्ह करतात. व्हिडिओ क्लिपमध्ये ही डिश चॉपिंग बोर्डवर दिसत आहे. स्टीकचा हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. सॉल्ट बेने आणखी एक फोटो शेअर केला आणि त्याला कॅप्शन दिले, येथे गुणवत्तेशी कधीही तडजोड केली जात नाही.

रेस्टॉरंटच्या मालकाने अबू धाबीमधील त्याच्या रेस्टॉरंटमधून फूड बिल शेअर केल्यानंतर काही दिवसांनी गोल्ड स्टीक इंस्टाग्राम स्टोरी आली, ज्यामुळे इंटरनेट वापरकर्त्यांना त्यात नमूद केलेल्या रकमेबद्दल धक्का बसला. बिलात असे दिसून आले की ग्राहकांनी 140,584 पौंड म्हणजेच 1.3 कोटी रुपये दिले. या शो-ऑफला इंटरनेटवर लोकांकडून फारसा प्रतिसाद मिळाला नाही.

टॅग्स :BillRestaurant