

rare 350-million-year-old crinoid fossil resembling a smiling set of dentures
esakal
इंग्लंडच्या नॉर्थंबरलँड किनारपट्टीवरील 'होली आयलंड' (Holy Island) येथे फिरायला गेलेल्या ख्रिस्टीन क्लार्क (Christine Clark) या महिलेला जमिनीवर एक विचित्र दगड दिसला. पहिल्या नजरेत तो दगड एखाद्या माणसाचे 'नकली दात' (Dentures) असावा असा भास होत होता. त्या दगडावर हुबेहूब मानवी दातांसारखी पांढरी रचना आणि एक हसणारे तोंड दिसत होते. मात्र जेव्हा हा दगड तज्ज्ञांकडे नेण्यात आला तेव्हा समोर आलेले सत्य थक्क करणारे होते. हा कोणताही साधा दगड किंवा मानवी वस्तू नसून तब्बल ३५ कोटी (३५० दशलक्ष) वर्षे जुना एक अतिशय दुर्मिळ जीवाश्म (Fossil) असल्याचे ब्रिटीश जिओलॉजिकल सर्व्हे (BGS) च्या संशोधकांनी स्पष्ट केले.