
Bride Groom viral video : नवीन लग्नाच्या रंगात गमतीशिवाय आनंदाचा हा क्षण काही पूर्ण होत नाही. अशीच एक विचित्र पण मजेशीर घटना एका लग्नात घडली. कारण काही वेळा ही मस्ती अनपेक्षित गोष्टींमध्ये बदलते आणि एक मजेदार दृश्य सगळ्यांसमोर येते. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे, ज्यामध्ये नवरदेवाच्या मित्रांनी एक मस्करी केली आणि त्याचा वेगळाच परिणाम झाला आहे.
व्हिडीओमध्ये आपण पाहू शकतो की नवरी आणि नवरदेव हार घालण्यासाठी एकमेकांसमोर उभे असतात. लग्नाच्या पारंपरिक रिवाजांनुसार हार घालण्याची ही एक खास वेळ असते. पण नवरदेवाच्या मित्रांच्या मजेशीर मस्करीमुळे हा खास क्षण बदलतो. नवरे नवरीच्या हार घालण्याच्या ऐन वेळी नवरदेवाचे मित्र त्याला उचलून घेतात, आणि नवरी एकदम थांबते. ती हार घालूच शकत नाही. पण त्यानंतर जो घडतो, तो आणखीच गमतीदार आहे.
नवऱ्याच्या मित्रांची मस्ती थांबत नाही ते पुन्हा नवरदेवाला आणखी उचलतात आणि या वेळी ती गडबड नवरीवर येते. अचानक, नवरीचा तोल गडबडत, तिचं डोकं छताला आदळत आणि ती उलटी पडते. हा व्हिडीओ सगळ्यांना थोडा धक्का देणारा आहे कारण एका पवित्र, गंभीर अशा लग्नाच्या समारोहात अशा प्रकारे मस्ती करणं त्यातली इज्जत कमी करणारं ठरू शकतं.
तरीही, या गमतीशीर व्हिडीओमध्ये हसू आणणाऱ्या प्रतिक्रिया पाहून लोक अजूनही हसत आहेत. व्हिडीओमध्ये पाहुण्यांची प्रतिक्रिया देखील पाहता येते, ज्यात त्यांनी नवरी-नवरदेवाला उचलून घेतल्याचे दृश्य चर्चेचा विषय बनले आहे. दोघेही हार घालण्यासाठी एकमेकांना स्पर्धा करत असताना नवरीचा तोल जातो आणि त्यानंतर तिची साडीही वरती जाते
हा व्हिडीओ आता सोशल मीडियावर वायरल झाला आहे, आणि @laxmi.ghosh.108889 ने इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडीओला हजारो लोकांनी पाहिलं आहे आणि विविध प्रतिक्रिया देत आहेत.
या मजेदार व्हिडीओने एक गोष्ट तरी सिद्ध केली आहे लग्नाच्या मजेशीर मस्तीने केवळ एक वेगळं रंग देण्याची भावना निर्माण केली आहे तर काही वेळा ही मस्करी त्या कुटुंबाच्या इज्जतीवर येऊ शकते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.