

तुम्ही सर्कस पाहिली असेल. किंवा चित्रपटात खऱ्या प्राण्यांची सर्कस दाखवतात तशी पाहिली असेल. त्या सर्कशीत ट्रेनरच्या सांगण्यावरून हत्ती नाचतात, सायकल चालवतात. वाघ, सिंह रिंगमधून उड्या मारतात. ते पाहून आपल्याला हसू येतं. पण, ते प्राणी मात्र रडत असतात. असाच एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये हत्तीला पाहून तुम्ही थक्क व्हाल. पण सत्य कळल्यावर तुम्हालाही हत्तीबद्दल वाईट वाटेल. या व्हिडिओमध्ये दोन महिला भरतनाट्यम करताना दिसत आहेत. त्यांच्या मागे साखळीने बांधलेला हत्ती उभा आहे.