Bicycle Viral Video : अर्ध्या चाकांवर सायकल चालवणारा अवलिया; पाहून म्हणाल पठ्ठ्याला मानलं राव! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Bicycle Viral Video

Bicycle Viral Video : अर्ध्या चाकांवर सायकल चालवणारा अवलिया; पाहून म्हणाल पठ्ठ्याला मानलं राव!

Bicycle With Rear Wheel Split Into Two: जगात वेगवेगळी शक्कल लढवत काम करणारे अनेक लोक आहेत. काहींच्या आयडीयाची कल्पना फसते तर काहींचे जुगाड लोकांची वाह वा मिळवून जातो. असाच एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.

या व्हिडीओतल्या व्यक्तीने आपल्या सायकलच्या मागच्या टायरचे दोन तुकडे केले, अन् आपले इंजिनिअरींग स्कील्स वापरत त्याला असं काही लावलं की, बघणाऱ्यांचे डोळे विस्फारले अन् स्वतःच्याच डोळ्यांवर त्यांचा विश्वास बसेना. अशी सायकल यापूर्वी कोणीही पाहिलेली नसेल.

दोन तुकड्याच्या चाकांची तयार केलेली ही सायकल इंजिनिअरिंग स्कील्सचा उत्तम नमूना म्हणून त्याचं कौतुक होत आहे. यूट्यूबवर या व्हिडीओला लोकांनी मोठ्याप्रमाणात लाइक केलं आहे.

टॅग्स :viral video