
Snake Viral Clip: सोशल मिडियावर अनेक विचित्र, भावनिक व्हिडिओ व्हायरल होत असतात. सध्या एका सापाचा व्हिडिओ सोशल मिडियावर तुफान व्हायरल होत आहे. अनेक लोकांना सापाची भीती वाटते. तर अनेकांना सापाचे नाव काढतांच थरकात उडतो.
सापांमध्ये अँनाकोंडा हा सर्वात मोठा साप समजला जातो. जर कोणी या सापाच्या विळख्यात सापडले तर मृत्यु निश्चित असतो. सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत भलामोठा अँनाकोंडा दिसत आहे. हा व्हिडिओ पाहून अनेकांना घाम फुटू शकतो.