Viral Video : अमृता फडणवीस आता इन्स्टास्टार रियाजसोबत! 'आज मैंने मूड ...'वर केला भन्नाट डान्स | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Viral Video

Viral Video : अमृता फडणवीस आता इन्स्टास्टार रियाजसोबत! 'आज मैंने मूड ...'वर केला भन्नाट डान्स

Viral Video : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या पत्नी अमृता फडणवीस या वेगवेगळ्या कारणाने चर्चेत असतात. अलीकडे त्यांच्या 'मैने मूड बना लिया है' या गाण्याने सोशल मीडियावर राडा केलाय. नेटकऱ्यांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया अमृता यांच्या या गाण्यावर उमटल्या आहेत. अमृता यांनी सोशल मीडिया स्टार रियाजसोबत ' मैने मूड बना लिया है' या त्यांच्या अल्बम साँगवर डान्स केलाय.

गेल्या काही दिवसांपसून अमृता फडणवीस यांच्या त्या गाण्याची चर्चा रंगली होती. त्या पहिल्यांदाच एका पंजाबी गाण्याच्या निमित्तानं चाहत्यांच्या भेटीला आल्या आहेत. गाण्याचा ट्रेलर व्हायरल होताच नेटकऱ्यांच्या प्रतिक्रियांना उधाण आले होते. त्यांनी वेगवेगळ्या कमेंटस करुन अमृताजींवर कौतूकाचा वर्षाव केला.

अमृता फडणवीस यांच्या एका ट्वीटमुळे चाहत्यांमध्ये उत्साह निर्माण झाला होता. काही पंजाबी ओळींसह अमृता फडणवीसांनी केलेलं ट्वीट चाहत्यांची उत्सुकता वाढण्यास पुरेसं ठरलं. यापूर्वी ट्वीटमध्ये अमृता फडणवीस यांनी आपल्या नव्या गाण्याची घोषणा केली होती. हे गाणं पंजाबीत आहे. यासोबतच त्यांनी आपला वेस्टर्न ड्रेसमधला एक फोटोही शेअर केला होता. (Video Viral)