
Viral Video : चक्क Chat GPT ने एअरलाइन्सलाच खडसावलं! व्हिडीओ होतोय व्हायरल
Viral Video : चॅट जीपीटीने सध्या लोकांच्या मेंदूवर राज्य करायला सुरुवात केली आहे असे म्हणायला हरकत नाहीये. गूगलला टक्कर देणारे फिचर AI टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून लाँच करणारं चॅट जीपीटी एका नव्या कारणाने आता चर्चेत आलंय. फ्लाइट लेट झाली म्हणून एका महिलेने रागात चॅट जीपीटीला एअरलाइन्सला रागावणारं, क्रोधित भाव व्यक्त करणारा मेल लिहीण्यास सांगितले. महिलेचा तो व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतेय.
चॅट जीपीटी हा एक चॅटबॉट आहे, जो प्रत्येक रिक्वेस्टला रिस्पाँड देतो. असाइनमेंटवर काम करण्यापासून आणि ईमेल तयार करण्यापासून ते वारंवार विचारले जाणारे प्रश्न संबोधित करण्यापर्यंत, हे बॉट सर्व करत आहे. आता एक नवीन प्रकरण समोर आले आहे, जिथे एका महिलेने एआय बॉट वापरला आणि फ्लाइटला सहा तास उशीर झाल्यानंतर चॅट बॉटला अशी सूचना दिली की त्याने फ्लाइट सहा तास लेट झाल्याबाबत आक्रमक ईमेल लिहावे.
व्हिडिओ होतोय व्हायरल
चेरी लुओने या महिलेने इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे जो चॅटबॉटद्वारे बनवलेला एक ईमेल दर्शवितो. तिने पोस्टमध्ये लिहिले की, 'हे भविष्य आहे. ChatGPT द्वारे कोणत्या नोकऱ्या बदलल्या जातील?' याचे.
सूचना मिळताच चॅट जीपीटीने लिहीला असा मेल
"आमच्या फ्लाइटला सहा तास उशीर झाला. मी ChatGPT ला एअरलाइनला ईमेल लिहायला सांगितले." तिने ChatGPT ला सांगितले, 'एअरलाइन्सला एक सभ्य पण आक्रमक ईमेल लिहा. आम्ही विमानतळावर असताना कोणत्याही अपडेटशिवाय फ्लाइटला 6 तास उशीर झाला. ३ तासापेक्षा जास्त वेळ प्रतीक्षा करूनही प्रवेश दिला गेला नाही.
त्यानंतर एआय बॉटने चेरी लुओच्या वतीने ईमेल लिहायला सुरुवात केली. विशेष म्हणजे तुम्ही रिक्वेस्ट केलेल्या प्रत्येक पैलूला लक्षात घेत चॅट जीटीपी त्याप्रमाणे तुम्हाला हवी ती माहिती किंवा मेल प्रदान करते. तसेच भविष्यात व्यवस्थापनेत कोणत्या सुधारणा आणायला हव्यात यावरसुद्धा काँटेंटमध्ये सल्ले दिलेले असते.
लुओने डिसेंबरमध्ये ही क्लिप शेअर केली परंतु बहुदा सध्या चॅट जीपीटीची होत असलेली सर्वाधिक चर्चा यामुळे हा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ आतापर्यंत 2 मीलियन वेळा पाहिला गेला आहे आणि 54,000 पेक्षा जास्त लाईक्स मिळाले आहेत.